गरीब वस्त्यांमध्ये मोफत शिक्षण देणाऱ्या पनाह कम्युनिटीजच्या चौथ्या सेंटरची येरवडा येथे सुरूवात

Panah-Communities-provides-free-education-in-the-slums-started-at-Yerwada


पुणे : गरीब वस्त्यांमध्ये आपल्या अद्वितीय शिकवण्याच्या पद्धातीमुळे नावलौकिक मिळविलेल्या पनाह कम्युनिटीज या सामाजिक संस्थेचे चौथे सेंटर नुकतेच (15 ऑगस्ट) भाट नगर, येरवडा येथे सुरू करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष व समाज सेवक विशाल हरी मलके, फरोग ॲप लॅब्स प्रायव्हेट लिमटेडचे सर्वेसर्वा मंगलम वशिष्ठ, कर्नल प्रमोधन मराठे आणि पनाह कम्युनिटीजचे अध्यक्ष शोएब सय्यद उपस्थित होते. तसेच पनाह कम्युनिटीज सोबत काम करणाऱ्या ई टीच स्कूल्स, लीडरशिप फॉर एक्विटी, टाप, टिच फॉर इंडिया, स्टेप टू वर्ड, सी एल आर आणि समथा सेंटर आदी संस्थांचे पदाधिकारी ही उपस्थित होते. या कार्यक्रमास जवळपास साडेतीनशे लोक उपस्थित होते. यावेळी कर्नल प्रमोधन मराठे यांनी त्यांच्या २६ वर्षांचा आर्मीचा अनुभव उपस्थितां समोर मांडला.   



पनाह कम्युनिटीजमध्ये मुलांना फक्त शालेय अभ्यासच शिकवला जात नाही तर मुलांना इथे twenty first century skills देखील शिकवले जातात. इंग्लिश आणि गणित ह्या विषयांचा पाया येथे मजबूत केला जातो; तसेच विद्यार्थ्यांना ऑलिम्पियाड आणि स्पर्धा परीक्षांसाठी तयार केले जाते.  या शिवाय विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर, फिल्म मेकिंग, आर्ट्स आणि गुणवत्ता विकास हे विषय देखील शिकवले जातात. पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष व समाज सेवक विशाल हरी मलके यांनी या सेंटरसाठी जागा दिली असून फरोग ॲप लॅब्स प्रायव्हेट लिमटेडचे सर्वेसर्वा मंगलम वशिष्ठ यांनी या सेंटरच्या उभारणीसाठी आर्थिक सहाय्य केले आहे. 



या सेंटरच्या उभारणीत अनेकांचे सहकार्य लाभले. वृंदा वशिष्ठ ह्यांनी पनाह कम्युनिटीजमध्ये एक शैक्षणिक रिसर्च करून संस्थेला मॉडेल डिझायनिंग मध्ये मदत केली. तसेच शोएब सय्यद, अंकिता पांडेय, हसनैन नक्वी, अर्शिया दास, हितेश कुमार यांचे यामध्ये मोलाचे योगदान आहे. या सेंटरचा कारभार रोहित जेटके यांच्या हाती सोपवण्यात आला असून हर्षल राजपूतभट, रुबिना खान, खुशी अडगळे, विनीत गुमने, रेश्मा बासले, प्रियांशू चोबे, प्रथा चवण, कृष्णा राजपूतभाट, नीलिमा आणि रितिका ही टीम काम करणार आहे.

Panah Communities, Panah Communities NGO



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.