मोदींनी अरबी समुद्रात भूमिपूजन केलेल्या "शिवस्मारका"चा संभाजी राजे छत्रपतींनीकडून दुर्बिणीने शोध

Sambhaji-Raje-Chhatrapati-discovers-the-Shiva-Smaraka-that-Modi-worshiped-in-the-Arabian-Sea-with-binoculars


मुंबई: चला शिवस्मारक शोधायला' अशा घोषणा देत पुण्याहून निघालेल्या संभाजी राजे छत्रपतींच्या रॅलीला मुंबई पोलिसांनी अडवलं.यावेळी संभाजीराजे छत्रपतींच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापटही झाली.संभाजीराजे अरबी समुद्राकडे जाण्यावर ठाम आहेत. तर संभाजीराजे छत्रपतींनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय.तर 5 हजार तिकीट काढले आणि दुर्बिणीतून पाहू आणि स्मारकाचं अभिवादन करू असं संभाजीराजे छत्रपतींनी म्हटलंय.शिवस्मारक पाहण्यासाठी आम्ही येथे आल्याचं संभाजीराजे छत्रपती म्हणालेत. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली


महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती यांचा ताफा आज मुंबईत गेटवे ऑफ इंडिया परिसरात पोलिसांनी अडवला. यानंतर संभाजी छत्रपतींनी तिथेच गाडीवर उभं राहून कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण दिलं. या भाषणात त्यांनी महाराष्ट्रातील शिवस्मारकाच्या रखडलेल्या कामावरून सरकारवर कडाडून टीका केली.२०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाचं जलपूजन केलं होतं. मात्र, आज २०२४ असूनही या स्मारकाचं काम सुरू झालेलं नाही. या पार्श्वभूमीवर संभाजी छत्रपतींनी आक्रमक भूमिका घेत सरकारवर सवाल उपस्थित केला, "शिवाजी महाराज हे देशाचे दैवत आहेत, मग अद्याप त्यांचं स्मारक का झालं नाही? केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार असताना देखील हे काम पूर्ण का झालं नाही?"



शिवस्मारकासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. परंतु, त्या समितीचं काय झालं, याबाबत संभाजी छत्रपतींनी सरकारवर प्रश्नचिन्ह उभं केलं. "समिती स्थापन झाली, परंतु तिचं पुढे काय झालं याची कुणालाच माहिती नाही. सरकारला विचारलं की ते हा विषय कोर्टात आहे असं सांगतात. यामुळे या प्रकरणात जनतेचा भ्रमनिरास होत आहे," असं ते म्हणाले.


संभाजी छत्रपती यांनी त्यांच्या भाषणात महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची पहिली मोठी चळवळ म्हणून शिवस्मारकाचा मुद्दा हाताळला आहे. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना 'चला शिवस्मारक शोधायला!' असं आवाहन केलं. "शिवाजी महाराजांचं स्मारक हे एक गौरवपूर्ण कार्य आहे, परंतु राज्य सरकारसोबत याबाबत चर्चा निरर्थक ठरली आहे," असं ते म्हणाले. सरदार पटेलांचा पुतळा झाला, मग शिवाजी महाराजांचं स्मारक का नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.