“एक झाड आईचे” वृक्षारोपण कार्यक्रम दरवर्षी साजरा करणार - शोभाताई आर धारीवाल

 

Thousands-of-trees-are-planted-all-over-India-every-year-by-RMD-Foundation-Shobhatai-R-Dhariwal

पुणे: आर एम डी फाऊंडेशन द्वारा दरवर्षी हजारो झाडं संपूर्ण भारतभर लावली जातात. यावर्षीही रांजणगाव , उपलाट तलासरी, वाघोली, दमण ईत्यादी ठिकाणी मोठ्याप्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण करतांना शाळा, महाविद्यालयं, रुग्णालय, सार्वजनिक उद्याने ,डोंगर भाग तसेच गायरान ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येते , त्यांना वर्षभर पाणी मिळेल व झाडं जगतील याची काळजी घेतल्या जाते . यापुढे शाळा-महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून “एक झाड आईचे” अशी योजना कार्यान्वीत करीत असल्याची माहिती आर एम डी फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा शोभाताई आर धारीवाल यांनी  महात्मा गांधी विद्यालय उरळी कांचन येथे दिली. प्रत्येक विद्यार्थ्याने झाडं लावावी, ती झाडं दत्तक घ्यावी व जगवावी असे आवाहन त्यांनी केले.


 


तसेच महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने 2700 स्वदेशी  झाडांचे वितरण व वृक्षारोपण करण्यात आले . वितरीत केलेल्या झाडांची निगा , वाढ व जोपासना केलेल्या विद्यार्थ्यांना  प्रमाणपत्र व योग्य बक्षीस देऊन गौरवण्यात येईल असेही त्या म्हणाल्या . यावेळी शाळेचे विश्वस्त श्री देवीदास भन्साळी यांचेही सहकार्य मिळाले. वृक्षवितरण व वृक्षारोपण वेळी  प्राचार्य श्री भोसले , शिक्षक व कर्मचारी वृंद तसेच विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते  .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.