महिलांना फक्त ४ तासाची नोकरी अन् ११ हजार पगार; चंद्रकांतदादांचा मास्टर प्लॅन

Women-only-4-hours-job-and-11-thousand-salary-Chandrakantada-s-Master-Plan

पुणे: नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून आणि उत्सवाच्या निमित्ताने उपासनेचे फळ सर्वांना लाभावे यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून कोथरुडमध्ये भव्य दिव्य अशा महा कन्यापूजन सोहळ्याचे आयोजन शुक्रवारी ( दि. ११)  करण्यात आले होते. राज्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणातील कन्यापूजन सोहळ्याने उपस्थित भारावून गेले. या सोहळ्यात नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी स्वत:  मंत्रोच्चाराच्या घोषात, आध्यात्मिक पद्धतीने सात मुलींचे पूजन केले.यावेळी सहभागी मुलींचे डोळे पाणावून गेले. चंद्रकांतदादा पाटील यांच्या या उपक्रमाचे उपस्थित मुलींनी व त्यांच्या पालकांनी मोठे कौतुक केले. 

 
धार्मिक श्रद्धांनुसार,नवरात्रोत्सव काळातील नवमी तिथीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी दुर्गा देवीच्या नऊ रूपांची मुलींच्या रूपात पूजा केली जाते. या उपासनेने दुर्गा मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि भक्तांच्या जीवनात सुख-समृद्धी येते, अशी श्रद्धा आहे. यासोबतच कन्यापूजना शिवाय नवरात्रीची उपासना यशस्वी होऊ शकत नाही, अशी देखील धारणा आहे. यानुसार या कन्यापूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांनी या अद्भूत सोहळ्यात हजारोंच्या संख्येने सहभाग नोंदवला. केवळ कोथरूड भागातील नव्हे तर सर्व पुणे शहरातून या सोहळ्यासाठी मुलींनी व त्यांच्या पालकांनी हजेरी लावली.


यावेळी बोलताना नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी, दरवर्षी १ लाख मुलींना स्वरक्षणाचे प्रशिक्षण द्यावे त्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल असे अश्वासन उपस्थित संस्था ना दिले. तसेच १ नोव्हेंबर पासून १ हजार माता भगिनींना ११ हजार मासिक वेतन मिळेल अशी नोकरी दिली जाईल असे ही सांगितले. शक्ती, बुद्धी आणि धनधान्य देणार्‍या मातांची रूपे वेगवेगळी असून,लहान मुलींमध्ये ही रूपे दिसत असल्याच्या भावना व्यक्त केल्या. कन्या हे देवीचे स्वरूप असते. तिच्या जन्माने प्रत्येक कुटुंबात सुख, समृद्धी आणि भरभराट होते. 


ते पुढे म्हणाले की, नवरात्रोत्सव काळात तिची पूजा म्हणजे साक्षात, आदिमायेची पूजा करणे आहे. मागील पाच वर्षांत कोथरुड मधील मुलींचे आयुष्य सुरक्षित करण्यासाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून हजारो मुलींचे पालकत्व स्वीकारले आहे. त्यासोबतच मानसी सारख्या उपक्रमातून वस्ती भागातील मुलींच्या व्यक्तीमत्व विकासासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे कोथरूड मध्ये आयोजित महा कन्यापूजन सोहळा आयोजित करण्यात आला असल्याचे यावेळी पाटील यांनी सांगितले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.