बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळून मोठी दुर्घटना, त्यातच सुनील तटकरे प्रवास करणार होते

Big-accident-helicopter-crashes-in-punes-bavdhan


पुणे: पुण्यात पुण्यातील बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत दोन पायलट आणि एका इंजिनिअरचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन उड्डाण घेतल्यानतंर अवघ्या तीन मिनिटातच या हेलिकॉप्टरला अपघात झाला. हे हेलिकॉप्टर डोंगराळ भागातून जात असल्याने तिथे मोठ्या प्रमाणावर धुके होते. या धुक्याचा अंदाज न आल्याने हे हेलिकॉप्टर कोसळले, असा अंदाज वर्तवला जात आहे. आता याबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. पुण्यात ज्या हेलिकॉप्टरला अपघात झाला, त्याच हेलिकॉप्टरने खासदार सुनील तटकरे प्रवास करणार होते.



मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन आज सकाळी 7.30 वाजता एका हेलिकॉप्टरने उड्डाण घेतले. यानंतर हे हेलिकॉप्टर मुळशी भागातील डोंगराळ परिसरातून जात होते. पुण्यातील पावसाचा जोर ओसरला असला तरी डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणावर धुक्याची चादर आहे. याच धुक्यामुळे हेलिकॉप्टरच्या वैमानिकाचा अंदाज चुकला आणि हेलिकॉप्टर थेट दरीत कोसळले, असा अंदाज वर्तवला जात आहे. हे हेलिकॉप्टर हेरिटेज एव्हिएशन कंपनीचे होते. ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्ट आणि एचईएमआरएल या केंद्र सरकारच्या संस्थेदरम्यान असलेल्या डोंगराळ भागात हा अपघात झाला.



हेलिकॉप्टरला भीषण आग या व्हिडीओत पुण्यातील डोंगराळ भागामध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याचे दिसत आहे. यानंतर त्या हेलिकॉप्टरचे अक्षरश: तुकडे झाले. या दुर्घटनेनंतर त्या हेलिकॉप्टरला भीषण आग लागली. त्यामुळे या परिसरातून धुराचे लोट पसरले होते. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. हिंजवडी पोलिसांच्या कंट्रोल रुमने यासंदर्भात माहिती दिली आहे.  दोन पायलट आणि एका इंजिनिअरचा मृत्यू दुर्घटनाग्रस्त झालेले हेलिकॉप्टर आधी धुक्यामध्ये अडकले होते. त्यानंतर ते खाली कोसळले. त्यानंतर ते खाली कोसळले. पिंपरी चिंचवड पोलिसांना याबद्दल माहिती देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी तातडीने हिंजवडी पोलिसात ही माहिती दिली. यानंतर हिंजवडी पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले. यात तिघांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये दोन पायलट आणि एका इंजिनिअरचा समावेश आहे.


पुण्यात अपघात झालेले हे हेलिकॉप्टर अजित पवार गटाचे नेते आणि खासदार सुनील तटकरे यांना घेण्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. सुनील तटकरे यांनी मंगळवारी ट्विन इंजिन ऑगस्टा बनावटीच्या याच हेलिकॉप्टरने प्रवास केला होता. विशेष म्हणजे सुनील तटकरे हे काल या हेलिकॉप्टरने पुण्याहून परळीला गेले होते आणि त्यानंतर ते याच हेलिकॉप्टरने पुण्याला परतले होते. यानंतर सुनील तटकरे हे हेलिकॉप्टर पुण्यातच सोडून मुंबईला रवाना झाले.



यानंतर आज सकाळी हे हेलिकॉप्टर सुनील तटकरे यांना नेण्यासाठी पुण्याहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र त्यापूर्वीच या हेलिकॉप्टरला अपघात झाला. सुनील तटकरे हे याच हेलिकॉप्टरने रायगड जिल्ह्यातील सुतारवाडी येथे जाणार होते. त्यासाठी या हेलिकॉप्टरने ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन उड्डाण केले होते. सकाळी पावणेसातच्या सुमारास या हेलिकॉप्टरने उड्डाण घेतले. मात्र, त्यानंतर काहीवेळातच हेलिकॉप्टर बावधन बुद्रुक परिसरातील दरीत कोसळले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.