चंद्रकांतदादांना मोठं मताधिक्य मिळवून देण्याचा प्रयत्न करणार" बाबुराव चांदोरे यांचा भैरवनाथासमोर शब्द

kothrud-bjp-chandrakant-patil-baner-baburao-chandore

पुणे: चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघातील प्रचाराला सुरुवात केली आहे. भारतीय जनता पक्षाने त्यांची उमेदवारी निश्चित केली आहे, आणि त्यांना पुन्हा एकदा विजयी करण्याचे ध्येय पक्षासमोर आहे. कोथरूडमध्ये चंद्रकांतदादांचे स्थान मजबूत आहे, आणि महायुतीच्या पाठिंब्यामुळे त्यांचा विजयाचा मार्ग सोपा होऊ शकतो.  नामदार चंद्रकांतदादा पाटील यांना कोथरुड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काल त्यांनी बाणेर बालेवाडी मधील ग्रामदैवतांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी ग्रामस्थांकडून ही नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे जंगी स्वागत करुन, विजयासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची देखील उपस्थिती होती.


राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना रविवारी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने कोथरुड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर रविवारी कोथरुडचे ग्रामदैवत म्हातोबाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. आज सोमवारी पाषाण मधील मारुती भैरवनाथ, बाणेर मधील भैरवनाथ मंदिर आणि सोमेश्वर वाडीतील सोमेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली. यावेळी नागरिकांकडूनही नामदार पाटील यांचे जंगी स्वागत केले.



यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत माननीय नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सर्व पुणेकरांनी भरभरून आशीर्वाद दिले. कोथरूड विधानसभा मतदारसंघातून ७५ हजारांचे मताधिक्य मिळाले. आता विधानसभा निवडणुकीत माननीय चंद्रकांतदादा पाटील यांना एक लाख मताधिक्याने विजयी करायचे आहे. त्यासाठी सर्वांनी काम करावे असे आवाहन केले. यावेळी नामदार पाटील कृतज्ञता व्यक्त करत, गेल्या पाच वर्षांत कोथरुडकरांची सेवा करण्याची संधी दिली. त्यामुळे पक्षाने पुन्हा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी देऊन कोथरुड करांच्या सेवेची संधी दिली आहे. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद सदैव पाठीशी राहोत, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबुराव चांदोरे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत बाणेर बालेवाडीकरांनी मुरलीधर मोहोळ यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून दिले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही चंद्रकांत पाटील यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन असा भैरवनाथाच्या साक्षीने शब्द देतो, अशी भावना व्यक्त केली.


यावेळी भाजप कोथरुड उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबुराव चांदोरे, भाजपा नेते गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, लहू बालवडकर, ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, सरचिटणीस सचिन दळवी,भाजपा महिला आघाडी अध्यक्ष अस्मिता करंदीकर,राहुल कोकाटे,मोरेश्वर बालवडकर,अनिकेत मुरकुटे, शिवम सुतार, राजेंद्र पाषाणकर,प्रवीण शिंदे, उत्तम जाधव, विवेक मेथा,रोहन कोकाटे, सचिन सुतार, सुभाष भोळ, सचिन सुतार,सुशील सरकते,कल्याणी टोकेकर, निकीता माथाडे, वैशाली कमासदार, पुनम विधाते, भगवानतात्या निम्हण,ज्ञानेश्वर पारखे,पोपटराव जाधव, तानाजी काकडे, , काशिनाथ दळवी,यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.