हक्काच्या पाण्यासाठी नेत्यांना जमिनीवर आणून पाण्याचा प्रश्न सोडवू - भूपेंद्र मोरे

 

solve-the-water-problem-by-bringing-leaders-to-the-ground for-right-water-Bhupendra-More

पुणे:‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी अवस्था सिंहगड रस्तावासीयांची आहे. शेजारीच असलेले धरण तसेच परिसरातून जाणारा कालवा यामुळे परिसरात पाण्याची वानवा नसावी, असे चित्र दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र धायरी, नऱ्हे भागात पाण्याची पाणीटंचाई आहे.गेल्या अनेक वर्षापासून पाण्यापासून वंचित राहिलेल्या सोसायटी धारकासाठी भूपेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखालील सोसायटीधारक, नागरिकांना हक्काच्या पाण्यासाठी "जो कोणी पाणी देणार त्याला आम्ही आमदार करणार "ह्या जल अभियान मोहीमेस प्रारंभ झाला. अभिनव कॉलेज परिसरातील प्रतिक व मल्हार सोसायटी यांना भेट देऊन सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांनी जल अभियानामागील उद्देश स्पष्ट केला. 



गेले अनेक वर्षापासून नऱ्हे गावातील नागरीक मूलभूत सुविधांपासून वंचित राहत आहेत. ह्या भागातील अनेक सोसायटी यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये जाऊनही लोकांना मूलभूत सुविधा हीत. पंधरा पंधरा वर्षे लोकप्रतिनिधी या भागातून निवडून येत आहेत. यांनी केले तरी काय? तुमच्या समस्या सोडवणारा नेता आमदार झाला पाहिजे.आता वेळ आली आहे तुमच्या हक्काच्या पाण्यासाठी जो पाणी देणार त्यालाच आपण मते देऊन आमदार करणार हा निर्धार करुयात. पुन्हा निवडणुका झाल्या की कोणी लक्ष देणार नाही. हीच ती वेळ तुमच्या हक्कांच्या पाण्यासाठी नेत्यांना जमिनीवर आणून आपल्या हक्काच्या पाण्याचा प्रश्न सोडवून घेऊया.कोणत्याही अडचणी साठी मी तुमच्यासोबत असणार आहे. असा शब्द मोरे यांनी यावेळी सोसायटी धारकांना दिला आहे. 



यावेळी सोसायटी धारक यांच्या तीने मोहन आंबासे यांनी भूपेंद्र मोरे यांचा सत्कार केला. यावेळी नागरिकांनी मोरे यांच्याकडे तक्रारींचा पाढा वाचा. पाणी नाही, रस्त्याची वानवा, कचरा उचलला जात नाही. नागरिकांसाठी स्वारगेट अभिनव कॉलेज अशी पीएमपीएमल बस सेवा सुरु करण्यात यावी.. अशा मागण्या करण्यात आल्या. सर्व सोसायटी धारकांनी भूपेंद्र मोरे यांच्या जलअभियानास पाठिंबा दिला. यावेळी सोसायटीधारक नागरिक, आणि महिलाही मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.