आमदार महेशदादा लांडगे यांच्यामुळे समाविष्ट गावांना मिळाला न्याय

Due-to-MLA-Maheshdada-Landge-the-involved-villages-got-justice


आमदार महेशदादा लांडगे यांनी समाविष्ट गावांचा प्रचंड कायापालट केला आहे.  या गावांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला. १० वर्षांपूर्वीची  गावे आणि आत्ताची गावे याची तुलना केली, तर आमदार  लांडगे यांनी समाविष्ट गावांचा केलेला विकास डोळ्यात भरतो, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर नितीन काळजे यांनी माध्यमांशी बोलताना केले.


माजी महापौर नितीन काळजे म्हणाले की, १० वर्षांपूर्वी समाविष्ट गावे विकासापासून वंचित होती. एकही आरक्षण विकसित झाले नव्हते. २०१७ मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यापासून नवीन गावांमध्ये विकासाची अनेक कामे करण्यात आली. विकास आराखड्यातील रस्ते झाले. च-होली, डुडुळगाव या भागात ५२ किलोमीटरचे रस्ते झाले. मोशी चिखली भागात सुमारे ४० किलोमीटरचे रस्ते झाले, असेही नितीन काळजे यांनी म्हटले आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने संत तुकाराम नगर येथे उभारण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या बरोबरीने मोशी येथे ६५० बेडचे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि २०० बेडचे कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यात येत आहे. यामुळे नागरिकांना आरोग्य विषयक सुविधा सक्षमपणे उपलब्ध होणार आहे. आमदार महेशदादा लांडगे यांनीभोसरी मतदारसंघात विकास कामांचा डोंगर उभा केला असून, त्यामुळे ते तिसऱ्यांदा निश्चितपणे विजयी होतील. - नितीन काळजे, माजी महापौर, पिंपरी-चिंचवड



वाघेश्वर टेकडी उद्यान, च-होली येथील बैलगाडा घाट,  अडीच एकर जागेत केलेले क्रीडांगण, वडमुखवाडी येथील स्विमिंग टॅंक, मोशी येथे साकारण्यात आलेले अतिशय सुंदर उद्यान, च-होली येथील स्मशानभूमी व दशक्रिया घाट, मोशीचा दशक्रिया घाट, चिखली येथील दशक्रिया घाट आदी विकास कामांचा उल्लेख नितीन काळजे यांनी केला. महेशदादा लांडगे यांच्या प्रयत्नांमुळे नव्याने समाविष्ट झालेल्या ग्रामीण भागात एकही वाडी-वस्ती  विकासापासून वंचित राहिलेली नाही, असा दावाही नितीन काळजे यांनी केला आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.