रासने यांच्या विजयासाठी तरुण नेत्यांची फौज मैदानात! भाजपचा कसब्यात विजय झाला तर 'हे' तरुण नेते बजावणार महत्वाची भूमिका

रासने यांच्या विजयासाठी तरुण नेत्यांची फौज मैदानात! भाजपचा कसब्यात विजय झाला तर 'हे' तरुण नेते बजावणार महत्वाची भूमिका


पुणे: पुणे शहरातील कसबा मतदारसंघात दीड वर्षांपूर्वी झालेला पराभव भाजपच्या फारच जिव्हारी लागला होता. मात्र या पराभवानंतर  तेव्हाच आगामी विधानसभा निवडणुकीत ही जागा जिंकण्याचा निर्धार भाजपने केला आहे.  हा निर्धार करून भाजप पक्ष थांबला नाही तर लोकसभा निवडणुकीत कसब्यात आघाडी देखील मिळवून दाखवली.  


दीड वर्षातच आमदार स्वतःच्या मतदारसंघातूनच लोकसभेला मागे पडल्यानंतर रवींद्र धंगेकर आणि भाजपचे हेमंत रासने यांच्यात दीड वर्षाने होणाऱ्या लढतीची दुसरी फेरी कोण जिंकणार याची उत्सुकता आहे. मात्र जर भाजपला विरोधी उमेदवारांना हरवत पुन्हा एकदा हा गड ताब्यात घेतला तर या लढतीत अतिशय महत्वाची अशी भूमिका भाजपकडील तरुण नेतृत्व बजावणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. पोटनिवडणुकीत झालेला भाजपचा पराभव टिळक-बापट कुटुंबियांच्या देखील मनात नक्कीच सलत होता म्हणूनच रासनेंना यंदा तिकीट मिळाल्यानंतर या कुटुंबातील युवा नेतृत्व पक्ष हित लक्षात घेत प्रचारात सहभागी झाले आहे.  

 


गेल्यावेळी टिळक कुटुंबीय काहीसे नाराज असल्याच्या चर्चा होत्या मात्र आता यावेळी या कुटुंबातील तरुण नेतृत्व सर्व नाराजी विसरून पक्ष शिस्त पाळत भाजपच्या विजयासाठी मोठी मेहनत घेत आहेत. केवळ टिळकच नव्हे तर बापट कुटुंबीय देखील कसब्यात पुन्हा एकदा भाजपचा विजय व्हावा यासाठी मेहनत घेत आहे.  स्वरदा बापट, कुणाल टिळक, गौरव बापट यांनी अक्षरशः मतदारसंघ पिंजून काढला असून या तीन युवा नेतृत्वाच्या सक्रीय सहभागामुळे कार्यकर्ते देखील चार्ज झाले आहेत. प्रचार फेरी असो, पत्रक वाटप असो छोट्या-मोठ्या सभा असो सर्व प्रकारच्या प्रचारात हे नेते अत्यंत सक्रीय असल्याचे दिसत आहेत.  


  या तीन नेत्यांच्या शिवाय सम्राट थोरात,योगेश समेळ, राघवेंद्र मानकर,अमित कंक,राजू परदेशी आणि प्रणव गंजीवाले हे युवा नेतृत्व देखील मोठी मेहनत घेत आहे. हे सर्वजण विधानसभा निवडणुकीत मोठ्या लीडने विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या तरुण नेतृत्वामुळे आता तरुणाई देखील मोठ्याप्रमाणात भाजपकडे वळत आहे. गणेश मंडळांचे तरुण कार्यकर्ते देखील भाजपला पाठींबा देवू लागले आहेत. महत्वाचे म्हणजे या सर्व तरुण नेतृत्वाला अनेक जेष्ठ नेते वेळोवेळी मार्गदर्शन करत असून नवे नेतृत्व या निवडणुकीत उदयाला येत आहे असे दिसत आहे. दरम्यान, या तरुण तगड्या नेतृवाच्या प्रयत्नांना यश किती मिळते हे निवडणूक निकालातून स्पष्ट होणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.