पुणे: येत्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून उमेदवारांकडून विविध माध्यमातून प्रचार सुरू आहे. या प्रचारादरम्यान सर्व उमेदवार आपली भूमिका जनतेसमोर मांडत असून ज्या नेत्याचे व्हीजन चांगले त्या नेत्याची पाठीशी उभी राहण्याची जनता भूमिका घेत आहे. विविध सामाजिक,राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना चांगल्या नेतृत्वाला पाठिंबा देत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वसमावेशक आणि आपला माणूस अशी प्रतिमा असणारे कसबा विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांना विविध संघटनांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.
काल अखिल भारतीय मराठा महासंघाकडून तसेच ओबीसी समाजाकडून देखील रासने यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. मराठा आणि ओबीसी समाजाचा पाठिंबा असणारे हेमंत रासने हे पुण्यातील पहिले उमेदवार ठरले आहे. या दोन्ही समाजासोबत भाजपला आणि हेमंत रासने यांना ब्राह्मण समाजाचा देखील जाहीर पाठिंबा मिळाल्याने हेमंत रासने यांची या मतदारसंघात ताकत वाढली आहे.
याशिवाय Association of Armature Boxing Pisoli Pune, श्री कालिकादेवी संस्थान, श्री गुरव प्रतिष्ठान, शिवसेना अल्पसंख्यांक सेल, स्वराज्य सेना, अखिल भारतीय ओबीसी महासंघ, कुंभार समाज समजोन्नती संस्था, यहोवा सिदकेणू ख्रिस्ती संघ, खंडेलवाल (वैश्य ) समाज, माहेश्र्वरी समाज संस्था, पुणे या संस्था आणि इतर अनेक संस्थांनी रासने यांना पाठिंबा दिला आहे.
हेमंत रासने हे २४ तास जनतेसाठी झटणारा नेता असून हे नेतृत्व सर्वसमावेशक आणि आश्वासक असल्याने आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत असे या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या अठरा महिन्यात रासने यांनी केलेल्या कामामुळे अनेक समस्या सुटल्या आहेत तसेच मितभाषी आणि नम्र असा हा कामाचा माणूस आता विधानसभेत गेलाच पाहिजे अशी भावना कसबा विधानसभा मतदार संघातील असल्याने आम्ही देखील पाठिंबा देत आहोत असे पाठिंबा देणाऱ्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले