पुणे: भाजपचे तसेच महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी सुपरस्टार पावन कल्याण यांच्या प्रचारासाठी तेलुगू सुपरस्टार आणि जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण पुण्यात येणार आहेत. पवन कल्याण यांच्या रोड शोमुळे निवडणूक प्रचाराची रंगत आणखीनच वाढणार आहे.पवन कल्याण हे दक्षिण भारतात खूपच लोकप्रिय असलेले कलाकार आणि राजकीय व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्या आगमनाची बातमी ऐकताच, कसबा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पवन कल्याण यांच्या लोकप्रियतेमुळे हेमंत रासने यांना मोठा फायदा होईल, अशी अपेक्षा भाजप नेत्यांची आहे.
आज दिनांक १७ नोव्हेंबर रोजी पवन कल्याण यांची प्रचार रॅली ची जोरदार तयारी मयुतिकडून केली आहे. संध्याकाळी ४ वाजता भवानी माता मंदिरापासून या रॅलीला सुरवात होणार असून रात्री ९ वाजता इनामके चौकात समारोप होणार आहे.
दरम्यान, पवन कल्याण यांच्या उपस्थितीत हेमंत रसाने यांच्या समर्थनार्थ एक विशेष सभा आयोजित करण्यात येणार आहे. या सभेत पवन कल्याण आपल्या खास शैलीत मतदारांशी संवाद साधतील. त्यांचं चार्म आणि भाषणशैली मतदारांना आकर्षित करण्यास मदत करू शकते. या सभेमुळे भाजपच्या प्रचाराला एक वेगळी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.