राजकीय घडामोडींसह कौटुंबिक नातेसंबंधांमधूनही चर्चेत राहणाऱ्या पवार घराण्यात आज एक आनंददायी क्षण अनुभवण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांचा ऋतुजा पाटील यांच्याशी साखरपुडा पुण्यात पार पडला. गेल्या काही काळात निर्माण झालेल्या राजकीय आणि कौटुंबिक मतभेदांच्या पार्श्वभूमीवर, या सोहळ्याने पुन्हा एकदा पवार कुटुंबाला एकत्र आणलं आहे.
![]() |
जय पवार आणि ऋतुजा पाटील |
कोण आहेत ऋतुजा पाटील?
ऋतुजा पाटील या सातारा जिल्ह्यातील फलटणमधील रहिवासी आहेत. त्या प्रवीण पाटील यांची कन्या असून, प्रवीण पाटील हे एका सोशल मीडिया मार्केटिंग कंपनीचे प्रमुख आहेत. ऋतुजा या उच्चशिक्षित असून, त्यांचा आणि जय पवार यांचा परिचय काही वर्षांपासून आहे. या दोघांच्या साखरपुड्याची चर्चा मागील काही दिवसांपासून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात रंगली होती.
![]() |
जय पवार आणि ऋतुजा पाटील |