भर उन्हात सुप्रिया सुळेंचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच बेमुदत धरणे आंदोलन

supriya-sule-protest-poor-road-condition-mp-supriya-sules-indefinite-sit-in-protest-in-front-of-the-district-collectors-office


पुणे: (९ एप्रिल) भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानाकडे जाणाऱ्या साडे सातशे मीटरचा रस्त्याची प्रचंड दूरवस्था झाली आहे. तो रस्ता क्रॉंक्रीटीचा करण्यात यावा,या मागणीसाठी बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे या पुणे जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर मागील तीन तासापासून उपोषण करित ठिय्या आंदोलनास बसल्या आहेत.तर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे सुप्रिया सुळे यांची भेट घेण्यास आले नाही.यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पाहण्यास मिळत आहे.  यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, केंद्र सरकारकडून कोट्यावधी रुपयांचा निधी मिळतो.त्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानते.पण भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान हे अंतर जवळपास साडे सातशे मीटरचे आहे.या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून तो रस्ता करण्यात यावा,यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून देखील प्रशासनाकडून दखल घेतली गेली नाही.ही दुर्दैवी बाब असून त्यामुळे आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाचा मार्ग अवलंबुन कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलनास बसले आहे.तसेच जोवर रस्त्याचा प्रश्न सुटत नाही.


यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, केंद्र सरकारकडून कोट्यावधी रुपयांचा निधी मिळतो.त्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानते.पण भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान हे अंतर जवळपास साडे सातशे मीटरचे आहे. या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून तो रस्ता करण्यात यावा,यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून देखील प्रशासनाकडून दखल घेतली गेली नाही.ही दुर्दैवी बाब असून त्यामुळे आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाचा मार्ग अवलंबुन कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलनास बसले आहे.तसेच जोवर रस्त्याचा प्रश्न सुटत नाही. तोपर्यंत आंदोलनाच्या ठिकाणाहून उठणार नाही. भले 30 तास का होईना,अशी भूमिका मांडत राज्य सरकारवर त्यांनी नाराजी व्यक्त केली.लाडक्या बहिणीच्या मतदार संघात भावाचे लक्ष नाही का त्या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, ते मला माहिती नाही आणि मी या ठिकाणी केवळ बनेश्वर येथील रस्त्याचा प्रश्न सुटला जावा,या मागणीसाठी उपोषणास बसले असल्याचे त्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.